हळदीतील चोरी प्रकरणी १ लाख १० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह एकास अटक

विनोद नारायण सुतार यास अटक ; राहायला आसरा दिलेल्या मित्राच्या घरीच मित्राने मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला !

मुरगूड ( शशी दरेकर ) : हळदी ( ता – कागल ) येथील महादेव शंकर खराडे यांच्या घरातून दि – ११ ऑगस्ट रोजी लोखंडी तिजोरीच्या लॉकरमधुन १ लाख १० हजार  किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

Advertisements

मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी केवळ २४ तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीस बेड्या ठोकल्या. या प्रकरणी विनोद नारायण सुतार(वय  २९ रा. हळदी ता. कागल ) यास अटक करुन १ लाख १० हजार सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत  केला आहे . राहायला आसरा दिलेल्या मित्राच्या घरीच मित्राने मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला !

Advertisements

           या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांचे तपासी पथक तयार करण्यात आले होते .शोध पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मारुती महादेव खराडे याचा मित्र विनोद नारायण सुतार हा गेले ४ ते ५ दिवसापासुन महादेव खराडे यांच्या घरी राहात होता. मात्र चोरी झाल्यापासुन त्यांच्या राहत्या घरातुन तो निघुन गेला असल्याचे समजले.
त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला.

त्यातच तो दि – १२ ऑगस्ट रोजी बिद्री ( ता. कागल) येथे चोरी केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यास येत असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने तपास पथकाने बिद्री सहकारी साखर कारखान्या च्या  गाडी अड्याजवळ सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले.

Advertisements

त्यावेळी त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीच्या दागिन्याबाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला . मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दोन पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता चोरीस गेलेल्या दोन सोन्याच्या रिंगा सापडल्या. त्यावेळी त्याने या सोन्याच्या रिंगा  हळदी ( ता. कागल ) येथील महादेव शंकर खराडे यांच्या घरातील लोखंडी तिजोरीमधुन चोरी केली असल्याचे त्याने सांगितले.

           त्याच्या ताब्यातून मिळालेला मुद्देमाल असा : ७० हजार किंमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची बोरमाळ , २० हजार किंमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र , २० हजार किंमतीचे अडीच ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या दोन रिंगा असा १ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अटकेत असुन त्याच्याकडे अधिक तपास मुरगूड पोलिस करीत आहेत .

             ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, उपविभाग करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले, पो.हे.कॉ. पारखे, पो.कॉ. राहुल केणे, पो.कॉ. खुशाल शिंदे, पो.कॉ. सचिन साळुंखे, पो.कॉ. जयवंत ढोकरे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

error: Content is protected !!