सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या कागल तालुका अध्यक्षपदी प्रकाश चौगुले

कागल : कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या कागल तालुका अध्यक्षपदी प्रकाश गणपती चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

Advertisements

जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी साताप्पा साठे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी कागल तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी चौगुले यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष साठे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश चौगुले यांनी संघटनेच्या कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सभासदांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. तर जिल्हाध्यक्ष साताप्पा साठे यांनी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असे सांगितले.
स्वागत उपाध्यक्ष काकासाहेब पाटील यांनी केले.

दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक कार्याबद्दल प्रफुल्ल नारायण कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सरचिटणीस आनंदराव राऊ डावरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त व किर्द वाचून दाखवली. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध समस्या आणि १ जानेवारी ते ३१ मे २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना काल्पनिक वेतनवाढ देण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली.

Advertisements

यावेळी के. डी. पाटील, काकासाहेब पाटील, अवेलीन देसा, आनंदराव डावरे, मोहन बाजीराव पाटील, आ. ना. पाटील, रा. बा. माने आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष काकासाहेब पाटील यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!