३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नसेल तर १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : राज्यातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. उद्या, १ जुलैपासून या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisements

या संदर्भात परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी माहिती दिली असून, एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील (RTO) अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisements

आरटीओमधील ‘या’ सेवा होणार बंद

जर तुम्ही वाहनाला एचएसआरपी प्लेट बसवली नसेल, तर तुम्हाला आरटीओशी संबंधित खालील सेवांचा लाभ घेता येणार नाही:

  • वाहन हस्तांतरण (Vehicle Transfer)
  • पत्ता बदलणे (Address Change)
  • कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे (Hypothecation Addition/Termination)
  • वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration)
  • वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण (Permit Renewal)

महत्त्वाची नोंद: वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी मात्र ही अट लागू राहणार नाही.

‘या’ वाहनधारकांना तात्पुरता दिलासा

ज्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट (RTO Slot Appointment) बुक केली आहे, त्यांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.

Advertisements

शासनाने निश्चित केलेले अधिकृत दर (जीएसटी वगळून):

परिवहन विभागाने या नंबर प्लेट्ससाठी अधिकृत शुल्क निश्चित केले आहे, जे फिटमेंट शुल्कासह खालीलप्रमाणे आहे:

वाहनाचा प्रकारअधिकृत दर (रुपये)
दुचाकी (Two Wheeler)₹ ४५०
तीनचाकी (Three Wheeler)₹ ५००
हलकी मोटार वाहने (LMV)₹ ७४५
मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने₹ ७४५

तीन कंपन्यांवर जबाबदारी

राज्यात एचएसआरपी बसविण्याच्या कामासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले आहेत:

१. झोन १ : रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Rosmerta Technologies Ltd)

२. झोन २ : रिअली इंडस्ट्रीज लिमिटेड (Real Industries Ltd)

३. झोन ३ : एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. (FTA HSRP Solutions Pvt Ltd)

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही मोहीम राबवून कडक कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर तातडीने एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!