मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात वातावरणात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे होते .        

Advertisements

येथील मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात झालेल्या या सर्वसाधारण सभेत मारुती रावण, किरण गवाणकर , चंद्रकांत दरेकर ,बाजीराव खराडे , चंद्रकांत जाधव या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .  सचिव सखाराम सावर्डेकर यांनी नोटीसीचे वाचन केले . सभेत विषयवार चर्चा होवून मान्यता देण्यात आली .

Advertisements

           सभेत अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी संघाच्या स्थापनेपासूनचा आढावा घेताना  सद्यस्थितीत ज्येष्ठांना अनेक कुटुंबात तणावाखाली जीवन जगावे लागत आहे .या वयात तणाव हा रोगापेक्षा भयकंर आहे . त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी या वयात अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने राहण्याची गरज आहे . म्हणूनच संघाचे विरंगुळा केंद्र हे ज्येष्ठांचे तणावमुक्तीचे  विश्रांतीस्थान बनले आहे . मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे कामकाज अत्यंत सुरळीत असल्यानेच संघाला अद्यावत रेकॉर्ड , सामाजिक कार्य , विविध उपक्रम व वार्षिक अहवाल असे चार पुरस्कार मिळाले आहेत .

             यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत उपाध्यक्ष पी डी मगदूम यांनी केले . दुखवठ्याचा ठराव संचालक जयवंत हावळ यांनी मांडला . सुत्रसंचालन अशोक डवरी यांनी केले . तर खजानिस शिवाजी सातवेकर यांनी आभार मानले .

.

Leave a Comment

error: Content is protected !!