गडहिंग्लज – कागल रस्त्याचे अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामाविरोधात आज उपनगराध्यक्ष  व नगरसेवकांनीच केली नाराजी व्यक्त

“ठेकेदारांचे इंजिनियर आंदोलन स्थळी न आल्याने  मुरगूड नागरीकानी व नगरसेवकांनी केला संताप व्यक्त “

मुरगूड ( शशी दरेकर ) : कामांमध्ये गती न वाढल्यास दोन दिवसात काम बंद पाडण्याचा इशाराही उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले व नगरसेवकांनी यावेळी बोलताना दिला. सध्या गडहिंग्लज ते कागल रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या महिन्याभराहून अधिक काळ मुरगूडमधील या रस्त्याचे अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. धुळीचे प्रमाण वाढले आहे.

Advertisements

हे काम याच गतीने चालले तर शहराचा मुख्य रहदारीचा हा रस्ता असल्यामुळे आगामी पावसाळ्यामध्ये नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. तसेच या रस्त्याच्या कामाच्या वेळी रस्त्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन लिकेज होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. खुदाई केलेला मुरूम, माती व खडे पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे ज्ञानेश्वर कॉलनी व अन्य ठिकाणी चार दिवस पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी थांबत आहे. यामुळे नागरिकांसाठीच्या पिण्याच्या पाण्याचा ऐन उन्हाळ्यात  बोजवारा उडत आहे. 

Advertisements

पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या कर्मचारी वर्गावर कामाचा बोजा पडत असून नागरिकांच्या संतापाला नगरपालिका व नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच पालिकेतील सत्तारूढ नगरसेवकांनी आज कामाच्या ठेकेदारा विरोधात हुतात्मा तुकाराम चौक येथे जमून निवेदन देण्यासाठी जमले.

यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेडके, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले पालिकेचे गटनेते सुहास खराडे जगन्नाथ पुजारी यांच्यासह मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी आपली भूमिका विषद केली.

   आंदोलन स्थळी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, सुनील मंडलिक, अनिल राऊत, दीपक शिंदे, रणजीत भारमल, राहुल शिंदे ,प्रा संभाजी आंगज, सुनील रनवरे,राजेंद्र कांबळे,  नगरसेविका सुरेखा लोकरे, वाय आर घाटगे, अरुण सावर्डेकर,शशिकांत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!