वकील संघटनेच्या प्रदेश उपाध्यपदी राणाप्रतापसिंह सासने यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वकील संघटनेच्या पुणे विभागाच्या वकील संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड राणाप्रतापसिंह सासने ( मुरगूड ) यांची निवड करण्यात आली. 

Advertisements

त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाच्या ” बाळासाहेब भवन ” कार्यालयामध्ये अॅड राणाप्रतापसिंह सासने यानां निवडीचे पत्र देण्यात आले.

Advertisements

     यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड हेमंत केजळकर , सचिव अॅड अनिल दळवी , अॅड ओंकार चव्हाण , अॅड स्वप्नील साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यानां निवडीचे पत्र देण्यात आले .
माजी खासदार संजयदादा मंडलिक , अॅड विरेंद्रभय्या मंडलिक यांचे विशेष सहकार्य लाभले.

     अॅड सासने यांच्या निवडीबद्द्ल वकील संघटनेच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून पुणे विभागात कामकाज अधिक गतीमान होईल.

   यावेळी अॅड सासने म्हणाले वकीलवर्गाच्या व पीडीतानां न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करण्याचा व संघटना अधिक बळकट करण्यास मी कटीबद्ध असल्याचा मनोदय त्यानीं व्यक्त केला.
     त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!