मुरगूड (शशी दरेकर) : अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १५ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणाऱ्या मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दि .०१ / ०५ / २०२६ रोजी छ . संभाजीराजे चौक , मॉर्निंग हॉटेल समोर आजरा येथे दिमाखात संपन्न होत असून शाखेचे उदघाटन मा . श्री . अशोक अण्णा चराटी ( नगराध्यक्ष आजरा नगरपंचायत आजरा ) यांच्या शुभहस्ते होणार आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा . हाजी बाळासाहेब बा . मकानदार ( संस्थापक ,लकी उद्योग , एम.जे. अॅग्रो उद्योग समुह मुरगूड ) हे भूषविणार आहेत . तसेच मा . निजामभाई लाडजी ( उद्योग आजरा -गोवा ) , मा . सुजय येजरे साहेब ( सहाय्यक निबंधक आजरा ) यांच्या उपस्थितीत या शाखेचा दिमाखदार उदघाटन सोहळा मोठया थाटात संपन्न होणार आहे .

या कार्यक्रमासाठी मुरगूड नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन मा .जावेद मकानदार , व्हा . चेअरमन मधुकर कुंभार , मॅनेजर अजितकुमार कापशे ,आजरा शाखेचे शाखाधिकारी मा . मोहसीन मुराद यानीं व संचालक मंडळाने या शाखेच्या उदघाटनास आवर्जून उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे .