प्रामाणिकपणे ७५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी “भीमराव यादव ” यानीं केली परत

मुरगूड ( शशी दरेकर ) : हमीदवाडा येथील साखर कारखाना साईट नजीक दत्त इंडिया कंपनी च्या डिलिशिआ दुग्ध विभागातील एका बॉयलर कामगारांने ७५ हजारांची सोन्याची अंगठी परत देऊन प्रामाणिकपणा दाखवला. भिमराव यादव रा. संकेश्वर असे या कामगारांचे  नाव आहे. नावात आणि आडनावात सुद्धा कृष्ण असलेल्या या कामगारांने दाखवलेल्या या कामगाराचे  सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements

सद्या पापड भाजून घ्यावेत असे उन्हाचे चटके बसत आहेत. त्यात बॉयलर जवळ काम करावे लागते.साहजिकच घरी एखादा पंखा आणावा असे स्वन बाळगणाऱ्या  बॉयलर कामगाराला सुमारे सोन्याची ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी सापडली. आता आपले स्वप्न पूर्ण होणार असे एखाद्याला वाटले असते पण त्या कामगारांने ती अंगठी प्रामाणिक पणे आपल्या मालकाकडे आणून दिली.

Advertisements

    कंपनीत क्रेट वर नावे टाकण्याचे काम करणाऱ्या निपाणीच्या अरुण नागावकर व त्याची पत्नी या दांपत्याची ती अंगठी होती. कंपनी मालकांनी त्यांना बोलावून ती अंगठी त्याच्याकडे सूपूर्त केली. बॉयलर कामगाराच्या या  प्रामाणिकपणा बद्धल त्याचे तोंडभरून  कौतुक केले असे प्रामाणिक कामगार मिळणे आज काल कठीण असते असे त्यांनी बोलून दाखवले.

डिलिशिआ दुध डेअरी कंपनीचे मॅनेजर सरबजीत सिंग, आहुजा, संकलन मॅनेजर संजय चौगुले (मुरगूड ), परचेस मॅनेजर दिग्विजय यादव, राम पाटील, विनायक कांबळे, यांनी वर्गणी काढून भिमराव यादव यानां तीन हजार रुपयांचे बक्षीस दिले. या प्रामाणिक पणा बद्धल परिसरात भिमराव यादव यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!