कागल ( प्रतिनिधी) : कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्र यांच्या वतीने पुणे-बेंगलोर हायवे रस्त्यावर हेल्मेट वापरण्यासाठी व रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने वाहनांचा वेग मर्यादित ठेवून वाहने चालवण्यासाठी मार्गदर्शन व विनंती करण्यात आली.
उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांनी हेल्मेट बदल जनजागृती करून लोकांना मार्गदर्शन केले. पो.हे.कॉ आनंद माने, पो.हे.कॉ चंद्रशेखर, लं बे पो.का जयसिंग पाटील, अमर भोसले व टू व्हीलर धारक उपस्थित होते.