सांगाव येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

कागल(विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी. काठी व दगडाचा वापर झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत.ही घटना रविवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मौजे सांगाव येथील शेतात घडली. कागल पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Advertisements

           पोलीस ठाण्यातील माहितीनुसार महेश अण्णासो पाटील, निलेश अण्णासो पाटील, अंकुश मारुती पाटील ,मारुती ज्ञानू पाटील, सर्व राहणार मौजे सांगाव व दुसऱ्या कुटुंबातील तानाजी पाटील( वाडकर), राहुल पाटील (वाडकर ), रवींद्र पाटील (वाडकर ), शोभा पाटील (वाडकर) या दोन कुटुंबात शेतजमिनीचा वाद आहे.

Advertisements
https://app.turtlefin.com/products/credit-card/public?partnerId=630e5137e72e970ef99f3b99

     रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नांगरट व खत विस्कटत असताना दोन कुटुंबात काठी व दगडाने हाणामारी झाली. या मारहाणीत राजू पाटील (वाडकर) व महेश पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. कागल पोलीस ठाण्यात हाणामारीची दोन्ही गटाकडून परस्परविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्याआहेत .पुढील तपास हवालदार भाट हे करीत आहेत.

Advertisements

1 thought on “सांगाव येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी”

  1. तंटामुक्त अभियान राबवायला हवे कारण समाजात लोकांमध्ये समजूतदारपणा कमी होत आहे

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!