वाय. डी. माने इन्स्टिट्यूटमध्ये पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत ‘सुविधा केंद्र’ सुरू

गेल्या ६० वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या ‘दि कागल एज्युकेशन सोसायटी’ संचलित वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत सुविधा केंद्र (FC Center) सुरू करण्यात आले आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या (DTE) ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या केंद्राला मंजुरी मिळाली आहे.

Advertisements

कागल व परिसरातील विद्यार्थी आणि पालकांचा वेळ व पैसा वाचावा याकरिता संस्थेच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवाची दखल घेत शासनाने ही मान्यता दिली आहे.प्रवेश प्रक्रियेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाईन फॉर्म भरणे, कागदपत्रे पडताळणी आणि ऑप्शन फॉर्म भरणे इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

Advertisements

अद्ययावत संगणक यंत्रणा, हाय-स्पीड इंटरनेट आणि जलद छपाई (Printing) मुळे विद्यार्थ्यांचा फॉर्म अगदी कमी वेळेत अचूक भरला जात आहे. पालकांच्या सोयीसाठी हे सुविधा केंद्र सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ सुरू राहणार आहे अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी श्री. भय्यासाहेब माने यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9607978493 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

error: Content is protected !!