अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

कागल (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला रियाज इस्माईल नाईकवाडे वय वर्षे 38 राहणार- मुळगाव, कोगनोळी ,तालुका निपाणी सध्या राहणार संत रोहिदास चौक कागल ,असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Advertisements

              अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांच्या माहितीनुसार मयत रियाज नाईकवाडे याचे कागल मध्ये चप्पल चे दुकान आहे. तो आपल्या सीडी 100 मोटरसायकल क्रमांक एम एच -09-ए डी-7958 वरुन कोल्हापूरहून कागल कडे येत होता.

Advertisements

दरम्यान लक्ष्मी टेकडी पासून काही अंतरावर असलेल्या विकासवाडी फाट्याच्या समोर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आला असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो जागीच गतप्राण झाला.

Advertisements

                मयत रियाज याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. अपघाता बाबतची फिर्याद झाकीर हरून नाईकवाडे राहणार कोगनोळी यांनी कागल पोलिसात दिली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार कोचरगी हे करीत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!