कागल : कागल येथील वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( पॉलिटेक्निक) ला ए आय सी टी इ व महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.
गेल्या 60 वर्षांपासून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. वाय. डी. माने अण्णा यांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या विचारांना पुढे नेण्याच्या उद्देशाने वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नवीन पॉलिटेक्निकला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री भैय्यासाहेब माने यांनी दिली.

यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (प्रवेश क्षमता प्रत्येकी 60) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
व्यावसायिक शिक्षण चालवने करता सज्जा असलेल्या कॅम्पसमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, वर्कशॉप, शिक्षणासाठी विविध नामांकित कंपन्यांशी करार, शासनाच्या विविध शिष्यवृत्ती, तज्ज्ञ प्राध्यापक, प्लेसमेंट सेल, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह इ. सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण उपलब्ध होणार असल्याचे विश्वस्त श्री बिपीन माने यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया संचालनालयाच्या नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने CAP Round मधून होणार असून अधिक माहितीसाठी वाय. डी. माने कॅम्पसमधील प्रवेशकक्षाशी (9607978493) संपर्क साधावा, असे आवाहन कॅम्पस डायरेक्टर सौ. शिल्पा पाटील यांनी केले.
सदर पॉलिटेक्निक मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील, भारतीय तांत्रिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रतापसिंह देसाई यांचे सहकार्य लाभले.सदर पत्रकार परिषदेस संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील माने, आय.टी.आय. चे प्राचार्य श्री अवधूत पाटील, कार्यालयीन अधीक्षिका सौ. दिपाली घाटगे इ.आदी उपस्थित होते.