व्हनाळी येथे कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
व्हनाळी(सागर लोहार): जगाला आज कधी नव्हे इतकी कुशल मनुष्यबळाची गरज आहे.दोन वर्षांचे आय.टी.आय.चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सध्या व्यवसायिक शिक्षण महत्त्वाचे असून आयटीआयच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनले आहेत. यशाला अनेक बाप असतात मात्र अपयश अनाथ असते.अपयश आले तर इतरांकडे बोट न दाखवता त्याची जबाबदारी स्वत:वर घेण्याची हिंमत ठेवा.असे मार्गदर्शन प्राध्यापक तात्यासाहेब मोरे यांनी केले.
व्हनाळी ता. कागल येथे कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नपूर्णा शुगर चे संस्थापक माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. यावेळी समकक्षता मान्यतेच्या माध्यमातून आयटीआयच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पत्रकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संजयबाबा घाटगे म्हणाले, पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये आयटीआय प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती . त्यामुळे शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित रहावे लागत होते म्हणूनच ग्रामीण विद्यार्थीही यशस्वी उद्योजक बनावा यासाठी आम्ही कै.मेजर आनंदराव घाटगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी पर्याय उपलब्ध केला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,एस .एस कुंभार, वाय.एस.धामण्णा, प्राचार्य आर.डी.लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गोकुळच्या माजी संचालिका सौ अरुंधती घाटगे, अकाराम बचाटे,के.बी.घराळ, अवधूत पाटील, स्वप्नील मेथे,सिमा मगदूम, सरिता पाटील, अभिजित पाटील, पी.डी. कांबळे ,दीपक जोंग,एम.बी.जाधव तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत सुभाष पाटील यांनी केले आभार राजेंद्र माळी यांनी मानले.