गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कागल (विक्रांत कोरे): कागल मध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक किलो 324 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे .जयपाल परमेश्वर सिंग ,वय वर्षे चाळीस राहणार इस्लामपूर पोस्ट माहेश्वरी बिजनोर उत्तर प्रदेश सध्या राहणार नेर्ली तालुका करवीर. आर्यन रमेश कांबळे वय वर्षी 19 राहणार शिवाजी चौक कागल अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत

Advertisements

       कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील लक्ष्मी टेकडीवर असलेल्या केतन सिमेंट पाईप कारखान्याजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी नजर ठेवली रात्री दहा वाजता आलेल्या जयपाल सिंग हा गांजा विक्रीसाठी आला त्याच्याकडून आर्यन कांबळे यांनी गांजा घेतला यावेळी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले .या दोन्ही आरोपींना कागल न्यायालयात हजर केले असा दोन दिवसाची पोलीस कोठडीचा आदेश देण्यात आला आहे.

Advertisements

         ही कारवाई कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस उपनिरीक्षक खरमुडेळध्य जमादार डिगोळे हवालदार विजय पाटील बोंबाळे तेजस्विनी पाटील ,तांबेकर बेडगे आदीने केली.

Advertisements

2 thoughts on “गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक”

  1. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!