कागल (विक्रांत कोरे) : ट्रकने टीव्हीएस लुना गाडीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने डोक्यावरून चाक जाऊन झालेल्या अपघातात 88 वर्षीय इसम जागीच ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कागल बसस्थानका नजीक नगारजी ओढ्याजवळ घडला. विलास रतनचंद शहा रा. शाहू वसाहत कागल,असे ठार तर झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

       कागल पोलिसातून मिळालेली माहिती अशी ,मयत विलास रतनचंद शहा हे कागल शहरातील असलेल्या जैन मंदिरात देवदर्शन घेण्यासाठी आपल्या टीव्हीएस लुना क्रमांक एम एच ०९-डी सी-६०८० वरुन गेले होते . ते देवदर्शन करून कागल बस स्थानका जवळच्या बोगद्यातून सर्व्हिस रोडवरून मुरगुड नाक्याकडे जात होते.

Advertisements

दरम्यान नगारजी ओढ्याजवळ शहा आले असता पाठीमागून आलेल्या  ट्रक क्रमांक एम एच- ०९-क्यु-६७८३ने  जोराची धडक दिली. यावेळी शहा यांच्या डोक्यावरून डाव्या बाजूचे मागील चाक गेल्याने ते जागीच गतप्राण झाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

      कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शना खाली पीएसआय डिगोळे हे पुढील तपास करीत आहेत.

One thought on “ट्रकने लुना गाडीस दिली जोराची धडक वृद्ध ठार”
  1. I share your level of appreciation for the work you’ve produced. The sketch is refined, and the authored material is stylish. However, you appear anxious about the prospect of embarking on something that could be considered questionable. I believe you’ll be able to rectify this matter in a timely manner.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!