मुरगुड ( शशी दरेकर ) – सानिका स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने आज पर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत .समाज परिlवर्तनाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या या फाऊंडेशनने एसटीचे चालक आणि वाहक यांना दिलेला मदतीचा हात खरोखर कौतुकास्पद आहे, असे मत मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. एस .पी.पाटील यांनी केले.
ते सानिका स्पोर्ट्स फौंडेशन मुरगूड ता. कागल यांच्यावतीने मुरगुड मधील सर्व एसटी ड्रायव्हर, कंडक्टर ,कर्मचारी यांचा संप सुरू असल्याने त्यांच्यावर आलेल्या उपासमारीत मंडळामार्फत वस्तू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुड शहर पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुनील डेळेकर होते.
स्वागत सुशांत मांगोरे यांनी तर प्रास्ताविक सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक, उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.ते म्हणाले एस. टी.उपासमारीची वेळ येणे हे दुर्दैव आहे. अशा अडचणीत असणाऱ्या आपल्या सहकारी मित्रांना सहकार्य करणे उचित आहे. यावेळी मारुती उर्फ बटु जाधव, प्रा. सुनील डेळेकर यांची भाषणे झाली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, कर्मचाऱ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष समीर कटके, कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, पत्रकार अनिल पाटील, उपप्राचार्य रवींद्र शिंदे, अविनाश चौगले, दिलीप निकम, राजू चव्हाण, शशी दरेकर , प्रवीण सूर्यवंशी, ओमकार पोतदार, अप्पाजी मेटकर, जे.बी.कुंभार, भैरवनाथ डवरी, पांडुरंग कुडवे, बाबुराव रेंदाळे, नंदकिशोर खराडे, सागर सापळे, विशाल जाधव, जगदीश चितळे, रणजित कापशे, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्जेराव साखळकर यांनी आभार मानले.