मडिलगे ( जोतिराम पोवार ) : श्री. सचिन दादा घोरपडे यांचे नेतृत्वाखालील श्री निनाई विकास सेवा संस्था मर्यादित वाघापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक( सन २०२२ ते २०२७)बिनविरोध पार पडली. सदर निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ खालील प्रमाणे श्री. तानाजी रावसो दाभोळे चेअरमनपदी तसेच श्री. आनंदराव घोरपडे व्हॉइस चेअरमनपदी निवड करण्यात आली.
चेअरमन पदाची संधी संस्थेशी अनेक वर्षे एकनिष्ठ असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील, पारंपारिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊन संचालक मंडळाने राजकारणामध्ये एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे
तसेच संचालक पदी श्री. सचिन दौलतराव घोरपडे, श्री. बळीराम पाटील, श्री. दिलीप आरडे, श्री. एकनाथ जठार, श्री. निवृत्ती दाभोळे, श्री. संभाजी आरडे, श्री धोंडीराम गुरव, श्री. एकनाथ कांबळे, सौ. वैशाली घोरपडे, सौ. सोनाली, सौ. सोनाली तानाजी आरडे बिनविरोध निवड करण्यात आली .
1 thought on “वाघापूर येथील श्री. निनाई विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध”