कागल : कागल पोलीस ठाणे हदिदमध्ये मोठया प्रमाणात चो-या होत असलेने त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत आरोपी किशोर राजाराम नलवडे वय 26 रा. दत्त गल्ली, रामकृष्णनगर, करनुर, ता. कागल जि. कोल्हापूर यास अटक करण्यात आली आणि त्याच्या कडुन दोन घरफोडया उघड करुन रोख रक्कम 25,000/- व एअरगन, साडया, होम थेअटर असा एकुण 41,000/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई, व उप विभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर श्री. संकेत गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र लोहार, पो.स.ई गच्चे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस नाईक विनायक औताडे, पोलीस अंमलदार सुनिल कांबळे, विकास चव्हाण, राजीव सांवत, महिला पोलीस अंमलदार आसमा जमादार यांनी ही कारवाई केली.