मुरगूड च्या युथ सर्कलचे कार्य कौतुकास्पद – सुहासिनीदेवी पाटील
सुनिता गळपाशे ठरल्या पैठणीच्या मानकरी
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथिल युथ सर्कलच्या वतीने गेले पन्नास वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करत आहे, त्यातच महिलांची, जेष्ठांची व तरुणांची एकजुट पाहून मला खरोखरच अभिमान वाटतो. या मंडळांने केलेले कार्य हे समाजाभिमुख व कौतुकास्पद असेच आहे असे प्रतिपादन सुहासनिदेवी प्रविणसिंह पाटील यांनी व्यक्त केले त्या गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे
लिंबू चमचा स्पर्धा : महिला
(लहान गट)
1.श्रीया उपलाने
2.समीक्षा पुजारी
3.पूर्वा वंडकर
मोठा गट–
1.नंदा किसन चव्हाण
2.सानिका राजेंद्र चव्हाण
3.ऋतुजा वैभव डेळेकर
संगीत खुर्ची स्पर्धा_: (पुरुष )
1.विशाल नलवडे
2.अनिल मेटकर
3.अनुज चव्हाण
संगीत खुर्ची स्पर्धा_: (महिला)
(लहान गट–)
1.श्रुतिका मेटकर
2.पूर्वा वंडकर
3.भक्ती मेटकर
मोठा गट–
1.सुनीता संजय गळपाशे
2.सीमा संजय उपलाने
3.ऋतुजा प्रमोद रामाने
रांगोळी स्पर्धा –
१) ऋतूजा रामाणे
२) तेजस्वीनी गळपाशे
३) दामिनी शिंदे
उत्तेजनार्थ : पुजा सारंग
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी श्रींची मूर्ती व सर्व महिलांसाठी साडी भेट दिल्याबद्दल यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मुरगुड सहकारी बँकेचे संचालक पदी निवड झाल्याबद्दल दिग्विजय पाटील, विठ्ठल मेंटकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी ए टू झेड लेडीज शॉपी (धनश्री चव्हाण) यांच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी वासंती पुजारी, आनंदी चव्हाण,शिवानी मेंटकर, सुशिला डेळेकर , मेघा मेटकर ,अमृता वि.वंडकर, सविता डेळेकर, सुवर्णा नलवडे,रोहीणी चव्हाण,महादेव वागवेकर, बळीराम डेळेकर,प्रमोद वंडकर, राहुल वंडकर,संजय गळपाशे, भानुदास वंडकर, विठ्ठल नंलवडे, कृष्णात चव्हाण आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .
यावेळी कै. साताप्पा डेळेकर यांच्या स्मरणार्थ आकाश डेळेकर यांनी सर्व विजेत्यांना चषक देण्यात आले. स्वागत मानिक वंडकर यांनी केले तर प्रास्ताविक राजू चव्हाण यांनी केले सुत्र संचालन नंदिनी सारंग यांनी तर आभार सानिका चव्हाण यांनी मानले.