हुपरी : चांदीकाम करणाऱ्या जितेंद्र सरवण सिंग (वय २०, सध्या रा. मानेनगर रेंदाळ, मूळ रा. हरदयाल, आग्रा, उत्तर प्रदेश) या युवकाने दिनांक शनीवारी 5 ऑक्टोंबर 2024 अंदाजे 6 वाजता हुपरी सूर्या तलावात उडी मारूण आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली, रविवारी त्याचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला.
Advertisements
जितेंद्र सरवण सिंग हा चांदी उद्योजक जयंत देशमुख यांच्या दुकानात तीन वर्षांपासून दागिने बनविण्याचे काम करीत होता. युवक मानेनगर वसाहतीत वास्तव्यास होते. शनिवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. युवकाचा सर्वत्र शोध घेत असत तो सापडला नाही. सूर्या तलावात आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास हुपरी पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार रावसाहेब हजारे व पोलीस विजय कांबळे करत आहेत.
Advertisements
