विद्यार्थ्यांनी चांगली संगत व चांगली पंगत शालेय वयापासूनच ठेवावी व व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन शहाजी लॉ कालेजचे प्राध्यापक डॉ. एम. सी. शेख यांनी केले

पिंपळगाव खुर्द (श्रद्धा पाटील) : व्हन्नूर ता. कागाल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर शाळेच्या वतीने आयोजित संवाद वकीलांशी या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशाळेचे मुख्याध्यापक पोवार व्ही. जी हे होते.

Advertisements

     डॉ. शेख यांनी सध्याच्या विकृत स्थितीची माहिती सांगून पालक व शिक्षकांनी अधिक जागृक राहण्याचे सांगीतले. यावेळी ड्रग्ज सेवन व त्याचे होणारे परीणाम आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी या बाबत एडवोकेट चंदन कुमार ओझा यांच्याशी संवाद केला. यामध्ये ड्रग्ज व मादक पदार्थाच्या सेवनाने होणारे शारिरीक व मानसिक परीणाम, यासंदर्भातचे कायदे व गुन्हे याविषयी सविस्तर माहिती घेतली.

Advertisements

अॅडव्होकेट शिवन्या शुक्ला व सौरभ पोवार यांनी विद्यार्थीनींना बॅड टच व गुड टच विषयी मार्गदर्शन केले. तसेच बाल हक्क कायदे व पोक्सो कायदा विषयी मार्गदर्शन केले तर सौरभ चौगुले, अथर्व अंबोळे व अनुष्का लवेकर यांनी भारतीय संविधान वावत मार्गदर्शन केले. 

           यावेळी श्रुती यशोपवेत, अॅडव्होकेट स्नेहल पाटील, अॅडव्होकेट पांडूरंग खोत व संग्राम कांवळे हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संदिप गुरव यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार जितेंद्र सावंत यांनी मांडले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!