मुरगूड (शशी दरेकर) : एम जे ऍग्रो इंडस्ट्री पुणे व लकी सेवाकेंद्र,मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जावेद धोंडीबा मकानदार( मॅनेजिंग डायरेक्टर एम .जे इंडस्ट्री )यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
आपल्या वाढदिवसाला वाचूया एखाद्याचे प्राण अनमोल भेट देऊन करूया आपण रक्तदान हा उदात्त्य हेतू डोळ्यासमोर ठेवून,वायफळ खर्च टाळून हार तुरे, गुच्छ, फटाके, केक हा खर्च टाळून रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.५१रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सर्वोपचार समन्वयाची टीम कार्यरत होती.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय विकास बडवे साहेब (पीआय मुरगुड पोलीस स्टेशन) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी बडवे साहेबांचा सत्कार माननीय श्री . हाजी धोंडीराम मकानदार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच कुस्ती कोच माननीय दादासो लवटे सर यांचा सत्कार जावेद मकानदार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा सत्कार पुष्पहार, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
आशियाई सुवर्णपदक विजेती पैलवान स्वाती शिंदे, मुरगुड जागतिक पदक विजेती पैलवान नंदिनी साळोखे, मुरगुड आंतरराष्ट्रीय खेळाडू पैलवान नेहा चौगुले, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते रोहन रंडे यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व मानधन धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या रक्तदान शिबिर कार्यक्रमास शाहू पुरस्कार व गोवा सरकार पुरस्कार प्राप्त माननीय वैद्य दत्तात्रय कदम, मुरगुड आणि कोरोना काळातील देवदूत माननीय डॉक्टर संजय रामशे-मुरगुड ,मुरगुड ग्रामीण रुग्णालयचे डॉक्टर माननीय अमोल पाटील , पत्रकार ओंकार पोतदार यांना पुष्पहार,शाल,श्रीफळ व समानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी दादासो लवटे, मुरगुड पोलीस स्टेशनची पीएसआय बडवे साहेब व धोंडीबा मकानदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्री. किरण गवाणकर, किशोर पोतदार, रवी खराडे, बशीरभाई खेडेकर, मधुकर कुंभार, प्रदीप वेसनेकर, सुहास भैरसेठ, निवास कदम, पत्रकार शशी दरेकर यांनी रक्तदान शिबिर कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सचिन मिसाळ यांनी तर सूत्रसंचालन संतोष कुंभार यांनी केले . शेवटी जावेद मकानदार यांनी आभार मानले.