मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड तालुका कागल येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडली. प्रारंभी युवा नेते सत्यजित पाटील (आबा), दिग्विजयसिंह पाटील ( भैय्या )यांच्या शुभहस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी पांडुरंग उपलाने महाराज अवचितवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये त्यांनी संत सेना महाराज यांचा जीवनपट उलगडला.
यावेळी मोठ्या भक्ती भावात सेना महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली . सत्यनारायण महापूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण रणवरे, उपाध्यक्ष सचिन रणवरे, सचिव विलास रणवरे, अमोल रणवरे, संजय बापू रणवरे, नंदू रणवरे, गुंडोपंत माने, एकनाथ माने, नामदेव माने, चंद्रकांत माने, दिलीप संकपाळ, विनायक रणवरे, वैभव पोवार, सा . गाहिनीनाथचे पत्रकार जोतीराम पोवार, यांच्यासह नाभिक संघटनेतील पदाधिकारी, विठ्ठल भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते