संदीप मुसळे यांचा ‘भोरकडी’  ग्रामीण वास्तवाचे हृदयस्पर्शी चित्रण असलेल्या कथासंग्रहाचे शनिवारी प्रकाशन”

भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार समारंभात होणार प्रकाशन

मुरगूड ( शशी दरेकर ) : ग्रामीण जीवनातील जिव्हाळा, वास्तव आणि संवेदनशील अनुभव यांचे जिवंत चित्रण करणारा संदीप मुसळे लिखित “भोरकडी” हा कथासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. लेखकाच्या पहिल्याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisements

      चिमगाव ता. कागल सारख्या ग्रामीण खेड्यात राहणाऱ्या संदीप मुसळे या लेखकांनी “भोरकडी” या कथासंग्रहामध्ये ग्रामीण भागातील साधी, निरागस आणि संघर्षमय माणसं जिवंतपणे उभी राहतात. गावाकडील संस्कृती, निसर्ग, बालपणाच्या आठवणी, तसेच बदलत्या काळात हरवत चाललेले ग्रामीण जीवन यांचे प्रभावी चित्रण या कथांमधून केले आहे.

Advertisements

इंदरी, जवानभाई, पैलवान सातूदा यांसारखी व्यक्तिरेखा वाचकांच्या मनात घर करून राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लेखक संदीप मुसळे यांनी शिक्षक म्हणून काम करताना अनुभवलेले अनेक प्रसंग, विद्यार्थ्यांचे जीवन, तसेच समाजातील विविध स्तरांतील वास्तव त्यांनी आपल्या लेखणीतून साकारले आहे. “भोरकडी” या शीर्षकाचा अर्थही त्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्पष्ट केला असून, आठवणींच्या फासातून मुक्त होण्यासाठी लेखन हे माध्यम ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे.

   मुरगूडच्या मंडलिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा .डॉ . अर्जुन कुंभार यांची “भोरकडी ” कथासंग्रहाला प्रस्थावना लाभली असुन
या पुस्तकासाठी माजी खासदार संजयदादा मंडलिक,ॲड. विरेंद्र मंडलिक, तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे . पुस्तकाचे भाषिक संपादन व मार्गदर्शन डॉ. मा. ग. गुरव आणि बा. स. जठार व प्रवीण सूर्यवंशी यांनी केली आहे.

ग्रामीण जीवनाचा अस्सल गंध जपणारा आणि वाचकांना अंतर्मुख करणारा “भोरकडी” हा कथासंग्रह मराठी साहित्यविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

    शनिवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता शाहू वाचनालय आणि अक्षरसागर  विचार मंच गारगोटी ता. भुदरगड यांच्या वतीने, भुदरगड साहित्यभूषण राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार समारंभात माजी आमदार बजरंग देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व मा. नाम. प्रकाशराव आबिटकर साहेब ( आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते तर मा. प्रफुल वानखेडे (ख्यातनाम लेखक,मुंबई), मा. कुलदीप राजे (सह. आयुक्त) यांच्या सह राज्यभरातील विविध साहित्यिकांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भोरकडी’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!