कागलमध्ये ३४५ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरी पत्रांचे वाटप

कागल (प्रतिनिधी): कागल येथील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या ३४५ लाभार्थ्यांना नुकतेच मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Advertisements

या कार्यक्रमाला महसूल विभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्यासह प्रवीण भोसले, भूषण पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे आणि नवाज मुश्रीफ, नवल बोते, अस्लम मुजावर, संजय चितारी, अरुण गुरव यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.

Advertisements

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून समाजातील निराधार, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार दिला जातो. कागल तालुक्यातील ३४५ पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना शासन निर्णयानुसार नवीन पेन्शन मंजूर करण्यात आली आहे.
स्वागत संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील,
प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. तर सूत्रसंचालन निशांत जाधव आणि आभार सदस्या सौ. पूजा मोरे यांनी मानले.

यावेळी कागलचे नगरसेवक, नगरसेविका, राजकीय कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळताच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले

Leave a Comment

error: Content is protected !!