ग्रामपंचायत चौदाव्या वित्त आयोगातून 93 महिलांना प्रशिक्षण
व्हनाळी(सागर लोहार) :
साके ता.कागल ग्रामपंचायतीच्या चैादा व्या वित्त आयोग निधीतून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ज्ञानदिप बहुउद्देशिय सेवा संस्था व ग्रामपंचायतीमार्फत ग्रामिण भागातील महिलांना शिवणकलास व फॅशन डिझायनिंगचे वीस दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सरपंच सैा. सुशिला पोवार, उपसरपंच निलेश निऊंगरे सर्व सदस्य प्रशिक्षणार्थी महिलांच्या उपस्थीत करण्यात आला. या शिबीरात 93 महिलांना शिवणकलास व फॅशनडिझायनिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब तुरंबे,सी.बी.कांबळे,मोहन गिरी, ग्रामसेवक संजय पाटील, विश्वास जाधव संस्थेच्या ऍश्वर्या कुंभार,मोहन पाटील तसेच सदस्य सैा. आकाताई चैागले, युवराज पाटील, सुजय घऱाळ, रविंद्र जाधव यांचे हस्ते प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास तेजस्विणी पाटील, मारूती पाटील, वर्षा घऱाळ, प्रियांका पाटील, माधुरी पाटील, आश्विणी सातुसे, सुरेखा ससे, दिपाली पाटील आदी प्रशिक्षणार्थी महिला उपस्थीत होत्या.