मुरगुड(शशी दरेकर): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, आंतर विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयच्या महिला मल्लांनी १३ मिळवून मानाची ट्रॉफीही जिंकली. या यशाचे मानकरी खालील प्रमाणे :- १) अंकिता शिंदे – ५९ किलो खाली – प्रथम, २) अंजली पाटील – ५७ किलो खाली – प्रथम, ३) मेघना सोनुले ५५ किलो खाली – द्वितीय.
पुरुष विभागात :- विजय डोईफोडे – ५९ किलो खाली – प्रथम, रोहित पाटोळे :- ५५ किलो खाली – तृतीय.
विजय डोईफोडे, अंकिता शिंदे व अंजली पाटील या तीन मल्लांची हरियाणा येथे होणाऱ्या आखिल भारतीय अंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेतकरिता झालेली आहे.
तसेच कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत :- १) शिवानी कुलकर्णी :- १०,००० व ५,००० मीटर धावणे :- तृतीय. २) राजनंदिनी गोधडे :- गोळा फेक :- द्वितीय क्रमांक पटकाविले. या सर्वच खेळाडूंचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी डॉ. शिवाजी होडगे, डॉ. ए. जी. मगदूम, प्रा. पी. आर. फराकटे, प्रा. सुरेश दिवाण, दिलीपराव कांबळे. व इतर मान्यवर उपस्थित होते. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शिवाजी पोवार यांचे मार्गदर्शन मिळाले . तर संस्था सचिव प्रा. खासदार संजय मंडलिक, अॅड. विरेंद्र मंडलिक, कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले.