व्हँनुर (श्रध्दा सुर्वे पाटील) : कागल तालुक्याचे माजी आमदार,ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.दौलतरावजी निकम यांची ९९ वी जयंती १९ सप्टेंबरला साजरी होत आहे.या निमित्त दरवर्षी शैक्षणिक,सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना स्व.दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.
यावर्षी जयंती समितीच्यावतीने शैक्षणिक व्यासपीठाचे प्रमुख एस.डी.लाड सर,व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे व अवनी संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांना स्व.दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले.हे पुरस्कार १९ सप्टेंबर २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजयदादा मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केले जाणार आहेत.
स्व.दौलतरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,ग्रामस्वच्छता,मुलांना खाऊ वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष एस.बी.पाटील,उपाध्यक्ष शिवाजी साताप्पा कांबळे,सचिव व्ही.जी पोवार,संस्था अध्यक्षा श्रीमती सुनंदा वसंतराव निकम,संस्था सेक्रेटरी यशवंत दौलतराव निकम, संस्थेचे संचालक आप्पासाहेब गणपती देसाई,जगदीश कलगोंडा पाटील, विवेक माधवराव निकम,संतोष दादासो पाटील,श्रीपती भैरु संकपाळ,माधवराव दौलतराव निकम हे उपस्थित होते.