मुरगूड (शशी दरेकर) : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला ईडीने केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मधून होत आहे. या कारवाईचा निषेध म्हणून मुरगूड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक ते नाका नंबर एक या मार्गावरून फेरी काढत मुरगूड शहर बंदचे आवाहन केले.
तसेच काही काळ रास्ता रोको करून येथील बस स्थानकाजवळ निषेध सभा घेतली. या निषेध सभेवेळी बोलताना बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले की गोरगरिबांना आधार वाटणारे तसेच कागल तालुक्याची श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणारे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेली कारवाई पूर्णपणे चुकीची आहे अशा नेत्यासाठी कागल तालुक्यातील गोरगरीब जनता रस्त्यावर येऊन या कारवाईचा निषेध करेल.
दलितमित्र डी डी चौगुले यांनी बोलताना सांगितले की कागल तालुक्याचे श्रावणबाळ म्हणून हसन मुश्रीफ जनसामान्यांमध्ये ओळख आहे अशा या नेत्याला जाणून-बुजून त्रास दिला जात आहे हा त्रास पूर्णपणे चुकीचा असून आपण या कारवाईचा निषेध करतो.
मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी माजी ग्रामविकास मंत्री यांच्यावरील कारवाईचा निषेध करून ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप केला .यावेळी दिग्विजयसिंह पाटील, प्रा .चंद्रकांत जाधव, शाहू फर्नांडिस,प्रणव बोरगावे, नंदकिशोर खराडे, राजू आमते, गुरुदेव सूर्यवंशी, जगन्नाथ पुजारी, राहुल वंडकर, राजू सोरप, नामदेव भांदिगरे , बंडा खराडे , रणजीत मगदूम , संजय मोरबाळे , आकाश आमते , विकी बोरगावे,यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते , नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते