मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड येथील प्रजापती ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयामार्फत पत्रकार व समाजसेवक यांच्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्रम्हाकुमारी लताबहेनजी यांनी विश्वविद्यालयाची माहिती दिली.
त्या पुढे म्हणाल्या आपण सर्वानी प्रथम स्वतःवरती प्रेम करायला शिकले पाहिजे . तरच आपल्याला आपणाकडे असलेलया चांगल्या गुणांची माहिती होईल , त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल.
यावेळी जगातील १४० देशातील विस्तार कार्य व युनो मार्फत मिळालेल्या शांतीदूत पुरस्काराबाबतही त्यानी सांगितले.
व्यकी व समाज यांना मन:शांतीची नितांत गरज आहे.नकारात्मक विचारांना दूर सारून सकारात्मक विचार रुजवणे हेच विद्यालयाचे उद्दिष्ट आहे.त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान दहा ते वीस मिनटे ध्यान केले पाहिजे .
सद्याची सामाजिक आणि राजकीय परिस्तिथी कशी अस्थिर बनली आहे हे सांगताना त्या म्हणाल्या की सर्पदंशाने एकाच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो पण द्वेष व सूडभावना यांचे विष समाजात पसरले की अनेक जीव गमावले जातात.यासाठी सकारात्मकता महत्वाची आहे.
यावेळी पत्रकार व समाजसेवक यांचा गुलाब पुष्प व विद्यालयाचे घोषपत्र देऊन सत्कार करण्यात आला. लक्ष्मी बहेनजी यांनी नियोजन केले. पत्रकारांच्या वतीने माजी अध्यक्ष सुनील डेळेकर यांनी विद्यालयाचे आभार मानले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार वि.रा.भोसले, शशी दरेकर,ओंकार पोतदार,विजय मोरबाळे ,राजू चव्हाण, शिवभक्त व समाजसेवक सर्जेराव भाट, जगदीश गुरव, विक्रांत भोपळे,भाई संजय मगदूम,भिकाजी भांदीगरे,संभाजी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.