कागल येथील उड्डाणपुलाखालील बोगद्यातील फुटपाथची दुरावस्था


कागल : कागल बसस्थानकामागील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली बोगद्यातील असणारे फुटपाथ फुटले असून कचरा काढण्यासाठी जागोजागी बसवलेली फरशीची झाकणे फुटली आहेत. यामुळे बोगद्यातून जाणार्‍या नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून जावे लागते.

Advertisements


या पुलाखालुन वाहनाच्या रहदारीने बोगद्या सतत गजबजलेला असतो. त्यामुळे याठिकाणी नेहमी किरकोळ अपघाताचे प्रसंग घडत आहेत. तरी याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विकास मंडळाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!