पेठवडगाव : पेठवडगाव येथे भरदिवसा एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Advertisements
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. सावर्डे येथील कुटुंबाशी ही घटना संबंधित असल्याचे समजते. पत्नीचा खून तिच्या पतीनेच केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Advertisements

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.