कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करणे अथवा हयातीचा पुरावा सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी अ.अ.नराजे यांनी कळविले आहे.
या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक १ नाव्हेंबर २०२३ रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेतील यादीत आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच या यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. शिवाय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी पुनःश्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्विकारली नाही, याबाबतची माहिती बँकांकडे सादर करावी अन्यथा माहे डिसेंबर २०२३ चे निवृत्ती वेतन अदा करण्यात येणार नाही.
तसेच संबंधित बँक व्यवस्थापकांनी या यादीमध्ये १० डिसेंबर २०२३ पुर्वी सर्व १०० टक्के निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची स्वाक्षरी होईल याची दक्षता घ्यावी. हयात असलेले दाखले १ नोव्हेंबर २०२३ ते १० डिसेंबर २०२३ पर्यंत बँकेत स्वाक्षरीसाठी उपलब्ध राहतील, असे ही पत्रकात नमुद केले आहे.
Very interesting points you have mentioned,
thanks for putting up.!