वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३४ दिनांक ०५-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौतुक डाफळे नामदार चषकाचा मानकरी

पै.आनंदा मांगले युवा चषक नरसिंह पाटील याने पटकावला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेता  कौतुक डाफळे (पिंपळगाव) याने पुण्यामध्ये सराव करणाऱ्या आमशीच्या आंतरराष्ट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला सात विरुद्ध दोन अशा गुण फरकाने पराभूत करत नामदार चषक पटकावला. कौतुकला नामदार चषक व रोख अडीच लाख रुपये आणि … Read more

कागल पंचायत समिती येथे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आणि जीवनदायी सीपीआर प्रशिक्षण

कागल (एस.  सणगर) : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी कागल पंचायत समितीमध्ये प्रशासक आणि गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण मोठ्या आनंदात पार पडले. या सोहळ्याला पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर, उपस्थितांनी एकत्रितपणे हुतात्मा स्मारकाचे पूजन करून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राज्याच्या विकासातील शहीदांना आदराने स्मरण केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. शिवाजी होडगे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी  प्रा डॉ.शिवाजी होडगे यांची निवड झाली. डॉ.शिवाजी होडगे यांनी याच  महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून ३४ वर्ष सेवा केली असून त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  जर्नल मध्ये ३० शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.तीन ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य …पीएच .डी … Read more

किरकोळ कारणावरून तरुणास चाकूने भोसकले

तरूण गंभीर जखमी मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव ता – कागल येथे गावातून मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवल्याचे व नाव  सांगितल्याच्या कारणावरून तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे. यामध्ये अजिंक्य भरत एकल (वय ३३ ) हा तरूण गंभीर जखमी असून मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सीपीआर मध्ये दाखल केले आहे. याबाबत … Read more

निधन वार्ता – अलका  तांबट

मुरगूड – मुरगूड येथील  अलका महादेव तांबट (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुरगुडच्या श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व मुरगूड बाजारपेठ येथिल राज सायकल दुकानचे मालक महादेव तांबट यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुले, सून, मुलगी, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षविर्सजन रविवार दिनांक ४ मे रोजी दत्त … Read more

मुरगुडच्या मैदानात शुभम सिद्धनाळ ठरतोय हॉटस्पॉट; प्रदेशात दुसऱ्या दिवशी बाल मल्लांनी गाजवले मैदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील “नामदार चषक” राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शुभम सिद्धनाळे याने गणेश कुरकुमे याला नमवून पुढील फेरीत प्रवेश केला. 52 किलो गटात अतिशय चुरशीच्या सामन्यात बेलेच्या माऊली टिपूगडे याने राशिवडेच्या किशोर पाटील याला आपल्या आक्रमक खेळीने पराभूत करत पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला. वैद्यकीय शिक्षण … Read more

नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्य नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धैचे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रतिमापूजन – तहसीलदार अमरदीप वाकडे, ध्वजारोहण – प्रांताधिकारी प्रसाद चौगले दीपप्रज्वलन – केडीसीसी संचालक भैय्या माने, गोकूळ संचालक किसन चौगले … Read more

नामदार चषक कुस्ती स्पर्धेस आज पासून शानदार प्रारंभ

आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू आखाड्यात  घुमणार उष्णतेमुळे कुस्त्या रात्रीच होणार आहेत; क्रीडाप्रेमी साठी गॅलरीची सोय मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्यानामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आखाडा सज्ज झाला असून आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू मैदानात घुमणार आहे.            कोल्हापूर जिल्हा व … Read more

शिवसेना खोकी धारक संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान आणि महाप्रसादाला मोठा प्रतिसाद

गोकुळ शिरगाव : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भावनेतून गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा येथे शिवसेना खोकी धारक संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, व तालुका प्रमुख विनोद खोत होते. छत्रपती शिवाजी महाराज … Read more

error: Content is protected !!