मुरगूड येथे छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्य  शिवप्रेमीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथे बाजारपेठ शिवप्रेमीतर्फै छ. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         गुरुवार दि .१९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी ठि.१० वाजता. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक मा. श्री. विजय सापळे यांच्या शुभहस्ते व आनंदराव कल्याणकर ( सर ), सौ.विद्या पॅलीस … Read more

श्रीमती शांताबाई शिंगारे यांचे निधन

मुरगूड येथील श्रीमती शांताबाई अरुण शिंगारे (वय ७६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात  दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे. न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली येथे सेवेत असलेले प्रविण शिंगारे यांच्या त्या आई होत.

पर्यावरण रक्षणात कागल नगरपरिषदेची सुवर्णभरारी; ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात द्वितीय, ३ कोटींचे बक्षीस जाहीर

कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यामध्ये कागल नगरपरिषदेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या देदीप्यमान यशाबद्दल नगरपरिषदेला ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या ‘२५ हजार ते ४० … Read more

सुरूपली येथे पायी चालत जाणाऱ्या महिलेला वाहनाची मागून धडक बसून ठार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरूपली ता. येथे महाशिवरात्रीचा महाप्रसाद घेवून घरी पायी चालत जाणाऱ्या  महिलेस टाटा मॅजीक गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला ठार झाली . श्रीमती  सुवर्णा बाळासो पाटील वय ५६ रा .सुरुपली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.       याबाबत मुरगूड पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी सुरूपली … Read more

भागशाळा कपिलेश्वर शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ): शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या बाल मनावर झालेले संस्कार बहुभोल असतात. या  संस्कारांच्या शिदोरीवरच भावी आयुष्यात येणारी आव्हाने पेलता येतात. असे प्रतिपादन  श्री शाहू कुमार भवन, मजरे कासारवाडा, तालका राधानगरी, भाग शाळा कपिलेश्वर,(तालुका राधानगरी) या  संस्थेचे सदस्य   श्रीकांत भोसले यांनी  केले. भाग शाळा कपिलेश्वरचे वार्षिक पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभा निमित्त आयोजित केलेल्या … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २४ दिनांक १६-०२-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

कोजिमाशि च्या चेअरमनपदी अविनाश चौगले यांची बिनविरोध निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे ६५० कोटी रुपये ठेवी  व दहा हजार शिक्षक सभासदांची अर्थवाहिनी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य अशा  कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्यूनि. कॉलेज येथील अविनाश महादेव चौगले यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. … Read more

मेतकेत भाविकांची चारचाकीची काच फोडून २९.७३ लाख किंमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने लंपास

मुरगूड ( शशी दरेकर ) : मेतके (ता.कागल) येथे बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची क्रेटा चारचाकी  (नं MH १४ KN ८८१०) गाडीची पाठीमागील काच फोडून अज्ञात चोरटयाने २९, २३, ५०० रु किंमतीच्या ४० तोळे सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची तसेच ५०,००० रोख रक्कम असलेली पर्स असे २९, ७३, ५०० किंमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली … Read more

ज्ञान टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला शिक्षक व शाळाच विद्यार्थी ज्ञानाची भूक भागवतील -डॉ. गणपती कमळकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्ञान आणि तना मनाच्या सक्षमते मुळे उद्याची पिढी उज्वल  होईल.स्वतः ज्ञान मिळवण्याचा आनंद अपूर्व असतो.स्वतः पुस्तके डिजिटल मीडिया वापरून शोधलेले ज्ञान शाश्वत राहते.पुढील काळात मुले ज्ञान मिळवण्याचा “शहाणपणा” आत्मसात करण्यासाठी शाळेत येतील.मुले ज्ञान  शोधू लागतील.ज्ञान कौशल्य मिळवण्याच्या पद्धती मार्ग आणि ज्ञाना सह टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला शिक्षक व शाळा मुलांची … Read more

ज्येष्ठांच्या आशीर्वादातून लोकसेवेचे व्रत जोपासणार – नगराध्यक्षा सुहासिनी पाटील.

मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. मुरगूड ( शशी दरेकर ) मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या आशीर्वादाने लोकसेवेचे व्रत जपू. “असा विश्वास मुरगुडच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुहासिनी पाटील यांनी व्यक्त केला. मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुरगूड नगरपरिषदेच्या नुतन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा,गटनेते, विरोधी पक्षनेते व नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी ते … Read more

error: Content is protected !!