प्रज्ञा शोध परीक्षेत शौर्या दरेकर हिचे घवघवीत यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील कन्या विद्या मंदिर ची विद्यार्थिनी कु. शौर्या आकाश दरेकर हिने समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत १०० पैकी ९६ गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक मिळवला तर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मिशन अंकुर परीक्षेत १०० पैकी ९४ गुण मिळवून जिल्ह्यात चौथा तर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.

Advertisements

त्याच बरोबर परफेक्ट टॅलेंट सर्च परीक्षेत १०० पैकी ८८ गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिला कन्या विद्या मंदिरच्या भारती साळुंखे मॅडम, वडील आकाश दरेकर आई शुभांगी दरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!