गहिनीनाथ गैबीपीर उरूस 2025 — मार्ग व पार्किंग व्यवस्था

कागल : गहिनीनाथ गैबीपीर उरूस 2025 निमित्त कागल शहरात मोठ्या प्रमाणावर भक्तांचा ओघ अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कागल पोलिस ठाणे व कागल नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्थेची आखणी केली आहे. उरूस काळात शहरातील रस्ते व पार्किंग व्यवस्थेसाठी विशेष योजना करण्यात आली आहे. प्रमुख मार्गांवर वन-वे (एकेरी) वाहतुकीचा मार्ग निश्‍चित करण्यात आला … Read more

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट'(Vision Document) विकसित भारताचे स्वप्न साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ Vision Document निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित  विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला. या बैठकीत विकसित महाराष्ट्र … Read more

मुरगूडच्या लक्ष्मी-नारायण पतसंस्थेने दिपावली पाडव्याला ३ कोटी ४ लाखावर ठेवीचे केले संकलन -किशोर पोतदार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकीक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ३ कोटी ४ लाख ४२ हजार इतक्या ठेवीचे संकलन केलेची माहिती चेअरमन किशोर पोतदार यांनी दिली. यावेळी त्यानीं ठेवीदार, हितचिंतकानीं मोठया प्रमाणात ठेवीच्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंतकरणापासून ऋण व्यक्त करत असेच इथून पुढेही … Read more

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर १ कोटी ७३ लाखावर ठेवीचे केले संकलन

कर्ज स्वरूपात फोर व्हिलर, टू व्हिलर अशा ५० गाड्यांचे केले कर्जवितरण मुरगूड ( शशी दरेकर ): स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या अशिर्वादाने व मा. खासदार संजयदादा मंडलिक तसेच युवानेते ॲड. विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि .२२/ १०/ २०२५ रोजी … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) आणि सोनोग्राफी विभाग सुरु करण्याबाबत निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) आणि सोनोग्राफी विभाग सुरु करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष मुरगूड नगरपरिषद दगडू तुकाराम शेणवी, यांनी आरोग्य मंत्री, मा. प्रकाश आबिटकर यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. मुरगूड परिसरातील ३० ते ४० गावांतील लोकांच्या रोज ३०० ते ४०० ओपिडी  होत असते. … Read more

कोजिमाशि पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी एकनाथ विलास आरडे

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीर्वादाने मा.खासदार संजयदादा मंडलिक युवा नेते विरेंद्रभैया मंडलिक यांच्या सहकार्याने शिक्षकनेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोजिमाशि पतसंस्थेत झालेल्या संचालक मंडळ सभेत एकनाथ आरडे यांची तज्ञ संचालकपदी ही निवड करणेत आली. एकनाथ आरडे हे क्रीडा विभाग प्रमुख म्हणून शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूड … Read more

कागल मध्ये गारमेंटला आग, पन्नास लाखाचे नुकसान

कागल  प्रतिनिधी : कागल शहरात आंबेडकर नगर येथे गारमेंट शॉप आहे.ती शॉपी मध्यरात्रीच्या सुमारास  भीषण आगीत भस्मसात झाली. यामध्ये  रुपये ५० ते ६० लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज विक्रम कामत (वय ३६, रा. आंबेडकर नगर, कागल) यांच्या मालकीचे दोन मजल्यांचे गारमेंट आहे .ते  आगीच्या … Read more

गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद निवडणूक: के. डी. पाटील यांचे नाव काँग्रेसच्या उमेदवार यादीत चर्चेत आघाडीवर

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) :  कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ पुरुष खुल्या विभागासाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर के. डी. पाटील यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेले के. डी. पाटील हे सौ.अंबूबाई पाटील इंग्लिश स्कूल, गोकुळ … Read more

कागलचे पोलिस निरीक्षक घावटे यांचा ठाकरे शिवसेनेमार्फत सत्कार

व्हनाळी : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून गंगाधर घावटे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्दल त्यांचा  कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी, शिवसैनिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.      यावेळी संभाजी भोकरे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील (बेलवळेकर) यांच्या हस्ते नुतन पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांचा सत्कार करण्यात आला.   पोलिस निरिक्षक … Read more

मुरगूड नागरी सह. पतसस्थेतर्फे सभासदानां दिपावली भेटवस्तूंचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : अल्पावधित नावलौकीक मिळवलेली मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदानां दिपावली भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सर्वेसर्वा हाजी धोंडीबा मकानदार होते. यावेळी पहिल्या पाच सभासद ठवीदारानां भेटवस्तूंचे वितरण संस्थेचे चेअरमन जावेद मकानदार, व्हा. चेअरमन मधूकर कुंभार, सुहास खराडे, निवास कदम, पांडूरंग कुडवे, या मान्यवरांच्या हस्ते … Read more

error: Content is protected !!