मुरगुड विद्यालया नजीक मंजूर टॉयलेट त्वरित सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा – पांडुरंग पुजारी

मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगुड नगरपालिकेकडून मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड जवळ हायटेक टॉयलेट बांधणे हे काम मंजूर झाले आहे . सुमारे 46 लाख रुपये खर्चाच्या किमतीची निविदा पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी आपल्या नगरपालिकेकडून कामाची कोणतीच सुरुवात झालेली नाही. बाजारपेठ मध्ये एकही टॉयलेट नगरपालिकेचे नाही त्यामुळे येथील व्यापारी लोक नागरिकांना खास … Read more

मुरगूड येथे श्री सोमेश्वर क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ञ प्रत्येक मंगळवारी उपलब्ध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे एस .टी. स्टँडनजीकआहार हॉटेलसमोर मकानदार बिल्डिंग , पाहिला मजला येथे श्री . सोमेश्वर क्लिनिकमध्ये लकी शेती सेवा केंद्र , एमजे ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे व श्री सोमेश्वर क्लिनिक मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि .१७ / ०२ / २०२४पासून आरोग्य चिकित्से करीता स्त्रीरोग तज्ञ मा. श्री डॉक्टर सुरेश … Read more

चंद्रकांत माळवदे यांच्या गोव-या आणि फुले पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल -येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या ‘गोव-या आणि फुले’ या आत्मचरीत्रास गारगोटी येथील ‘अक्षरसागर  साहित्य मंच’ द्वारा राज्यस्तरीय पुरस्कार  नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षी विविध प्रकारच्या दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी या मंच तर्फे दिल्या जाणा-या ‘राज्यस्तर पुरस्कार योजनेंतर्गत’,  सन २०२३-२०२४ या वर्षी प्रकाशित पुरस्कारांची  नुकतीच घोषणा  … Read more

मुरगुडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी

अविनाशदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मुरगूड ( शशी दरेकर ) : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 350 वी जयंती हुतात्मा तुकाराम वाचनाच्या वतीने मोठ्या -उत्साहात साजरी झाली. अविनाशदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. गहिनीनाथ समाचार चे प्रतिनिधी शशिकांत दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवजयंती … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २३ दिनांक १९-०२-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

उद्या पासून लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक रस्त्याची उजवी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद

उद्या पासून लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक रस्त्याची उजवी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राहणार बंद कागल (सम्राट सणगर) : कोल्हापूर वनवृत्तातील वनरक्षक (गट-क) भरतीप्रक्रीया सन २०२३ च्या अंतर्गत २४९ पदांच्या भरतीप्रक्रीया सुरू आहे. भरतीप्रक्रीयेअंतर्गत पात्र पुरुष उमेदवारांची ५ कि.मी. व महिला उमेदवारांची ३ कि.मी. धावण्याची परीक्षा/धाव चाचणी घ्यावयाची … Read more

सख्या बहिणीचा खून करणाऱ्या तिघाना आंध्रप्रदेशातून अटक

मुरगूड ( शशी दरेकर ) : लिंगणूर (ता. कागल ) येथे पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने सख्या बहिनीचा भाल्याने भोसकून खून करणाऱ्या तिघांना मुरगूड पोलिसांनी भीमावरम ( आंध्रप्रदेश) येथून अटक केली आहे. देवेंद्रप्पा आदमास पवार वय (२०),  पियूष उर्फ टायटन पवार(२२), चरण उर्फ शंकर शंकराप्पा पवार(३०) रा. अंजनगाव जि. अमरावती अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात … Read more

छ. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य बाजारपेठेत विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल बाजारपेठेमध्ये शिवप्रेमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि .१९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मा . श्री . अॅड सुधिर सावर्डेकर ( वकील ) यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, मा. श्री. राहुल शिंदे ( … Read more

खाऊगल्लीतील गुदरमलेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड एस टी .बसस्थानक ते महात्मा गांधी मार्ग या मार्गावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या अनेक वर्ष झाली रस्त्यावरच अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सुप्रिम कोर्टापर्यंत वाद सुरु होता अखेर पालिकेने न्यायालयीन आदेशानुसार ही खाऊगल्ली आज अतिक्रमणमुक्त केली. त्यामूळे या गुदमरलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य … Read more

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता पाठपुराव्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई, दि. 15 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता सेवानिवृत्त (भाविसे) अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच सरहद संस्था, पुणे चे अध्यक्ष संजय नहार हे या समितीचे सदस्य असणार आहेत. याबाबतचा … Read more

error: Content is protected !!