सरवडे येथे “शांभवी रेपे” हिचा प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) सरवडे ता . राधानगरी येथिल जिज्ञाशा प्री . प्रायमरी स्कूलचे सर्वेसर्वा बाबासाहेब रेपे यांची कन्या शांभवी बाबासाहेब रेपे हिचा प्रथम वाढदिवस रामकृष्ण मंगल कार्यालय सरवडे येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. शांभवी हिला  दिर्घायुष्य लाभो अशी पै- पाहुणे, तसेच मित्रपरिवानीं ईश्वरचणी प्रार्थना केली. या वाढदिवासावेळी सेवानिवृत पोलिस शिवाजी चंद्राप्पा पाटील … Read more

मुरगुड नगरपालिकेवर माजी खासदार मंडलिक गटाने झेंडा फडकविला

जागांचे बलाबलशिवसेना १३ नगराध्यक्षासह, भाजपाच्या ४, राष्ट्रवादी ३ आणि शाहू आघाडी १ मुरगूड ( शशी दरेकर )       मुरगुड नगर परिषदेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक गटाने झेंडा फडकविला आहे,  मंडलिक गटाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत माजी खासदार प्रा.संजय मंडलिक आणि भाजपचे नेते प्रविणसिह पाटील यांचा … Read more

कागल नगरपरिषदेचा निकाल

3813….6 प्रभाग पूर्ण …राष्ट्रवादी काँग्रेस शाहू आघाडी 12 उमेदवार विजयी दुसऱ्या फेरी अखेर कागल नगराध्यक्ष  पदासाठी सविता माने  3000 मतांनी आघाडी वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. सविता प्रताप माने पहिल्या फेरीत 1387 मतांनी आघाडी

मुरगूड येथे गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य  युवकांची स्वच्छता मोहिम

मुरगूड ( शशी दरेकर ) अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेने ग्रासलेल्या या समाजाला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी खूप प्रयत्न केले.सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मुरगूड मधील युवकांनी दत्त मंदिर, नदी घाट परिसर, स्मशानभूमी आणि परिसर गाव तलाव परिसर, ऑक्सीजन पार्क परिसराची स्वच्छता केली.       यावेळी मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा बाहेर काढून त्याची … Read more

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून करंजीवणे येथे गवताच्या गंजीना आग शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुरगूड ( शशी दरेकर ) : करंजीवणे तालुका कागल येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून गवताच्या गंजी पेटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.       याबाबत समजलेली हकीकत अशी की करंजीवणे येथील ग्रामस्थ विद्यामंदिर शाळेच्या शेजारी असणाऱ्या गोठण या ठिकाणी जनावरांसाठी गवत आणि पिंजर अशा प्रकारचे जनावरांचे खादय जमा करून ठेवतात या ठिकाणी महावितरण कंपनीची ११००० व्होल्ट क्षमतेची … Read more

पालकांची संस्कारशील सजगताच मुलांचे भवितव्य सावरू शकते- प्राचार्य डॉ. होडगे

मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी एनसीसी विभागामार्फत घेण्यात आलेल्या पालक मेळावा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकांना मार्गदर्शन केले.  सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालकांचा आधार विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू बनवतो. प्रसार माध्यमांच्या मोहजाळात अडकण्यापासून फक्त पालकांची सजगताच त्यांचे भवितव्य सावरू शकते असे ते म्हणाले. … Read more

गारगोटी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती आजही चिरंतन – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड (शशी दरेकर) – १३/१२/१९४२ च्या गारगोटी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती आजही चिरंतन असल्याचे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.         प्राचार्य होडगे पुढे म्हणाले की, आजच्या युवा पिढीला हा गारगोटीचा रणसंग्राम समजावा, … Read more

मुरगूड केंद्रावर नवोदय प्रवेश परीक्षा सुरळीत

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगुड तालुका कागल येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालय साठी असणारी प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडली. प्रविष्ट ३६० विद्यार्थ्यापैकी ३५३ विद्यार्थी प्रत्यक्ष हजर होते ७ विद्यार्थी गैरहजर राहिले. या केंद्रावर केंद्रीय निरीक्षक म्हणून धनाजी सातपुते यांनी तर केंद्र संचालक म्हणून प्राचार्य एस. पी. पाटील यांनी … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचा लेखाजोखा : आठ महिन्यात ६० सिझेरियनसह २४९ मोठ्या शस्त्रक्रिया

मुरगूड ( शशी दरेकर )       येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर अखेरच्या आठ महिन्यात विविध सेवा देण्यात आल्या. त्यापैकी नोव्हेंबर २०२५ अखेर सिझेरियनद्वारे ६० प्रसूती (बाळंतपण) सह २४९ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कांबळे यांनी बोलताना दिली.          फेब्रुवारी २०२५ पासून येथे महात्मा ज्योतिबा फुले जन … Read more

हुतात्मा दिन पूर्वसंध्येला  दीपोत्सवाने हुतात्म्यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ): हुतात्मा दिन पूर्वसंध्येला मुरगुड ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम भारमल या ऐतिहासिक चौकात दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या हस्ते या दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रा. डी डी चौगुले, ए पीआय शिवाजीराव करे, जयवंत हावळ, समाधान सोनाळकर यांनी याप्रसंगी आपल्या … Read more

error: Content is protected !!