जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका – पी. जी. केणे
मडिलगे (जोतीराम पोवार) : समोरच्या व्यक्तीला कधीही कमी न लेखता जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक पी.जी.केणे यांनी केले ते 28 वर्षानंतर एकत्र जमलेल्या वाघापूर हायस्कूलच्या 1995 ..96 सालच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचा मानपत्र सत्कार सोहळा व स्नेह मेळावा आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गुरुवर्य म्हणून बोलत होते. प्रारंभी पी जी … Read more
युवा उद्योजक ओंकार घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
सुळकूड (सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील युवा उद्योजक ओंकार सदाशिव घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी दिपावली निमित्त सुळकूड मधील सर्व ग्रामस्थांना घाटे उद्योग समूहाच्या वतीने भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. युवा उद्योजक ओंकार घाटे यांची पुणे शहरात घाटे कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख आहे. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय … Read more
कुरणी बंधाराऱ्यावरची वाहतूक धोकादायक
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आता जीर्ण होत आला आहे. बंधाऱ्यावर दोन्ही बाजूस असलेले कठडा खांब एकेक करून ढासळत आहेत.त्यामुळे वाहतुकीस हा बंधारा धोकादायक बनला आहे. खालून पाण्याचा वाहता प्रवाह आहे.पुलावरून शाळेची मुले पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जातात. वडाप व अवजड वाहनांची पण वाहतूक सुध्दा सुरू असते.तुटलेल्या खांबामुळे … Read more
कागलला गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती
कागल (सलीम शेख): दिवाळी आणि गैबी उरुस या सणांच्या निमित्त कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले यांच्या प्रतिकृतींचे अद्भुत प्रदर्शन भरले आहे. शहरातील प्रत्येक चौक आणि गल्लीमध्ये लहान-मोठे मुले आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा अद्भुत नमुना मांडत गडकिल्ले उभारत आहेत. या वर्षीच्या प्रदर्शनात गडकिल्ले बांधणीच्या बाबतीत एक नवीनच उंची गाठली आहे. किल्ल्यांची हुबेहू प्रतिकृती, त्यांची आकर्षक … Read more
कागल गहिनीनाथ गैबी उरुसात भक्तीचा महासागर
कागल(सलीम शेख): कागल येथील ग्रामदैवत हजरत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुस रविवारी भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर भव्यदिव्यरीत्या सुरू झाला. यात्रास्थळी भाविकांची मोठी गर्दी उमटली. पहिल्या दिवशी झालेल्या गलेफाच्या कार्यक्रमात हजारो भक्त उपस्थित होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी, गुरूवारी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा गलेफ,पाचवा गलेफ पार पडला. या प्रत्येक दिवशी भक्तीभावाने भक्त दर्गेत दाखल होत … Read more
पैलवान संदिप मोठे, भारत मदने यांनी कागल चे कुस्ती मैदान जिंकले
शाहू साखर कारखान्याकडून श्री. गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त आयोजन कागलः येथील ग्रामदैवत श्री.गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्या झाल्या. यामध्ये सांगलीचा संदिप मोठे याने उपहिंदकेसरी तुषार डुबे याला घुटना डावावर चितपट केले. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये बारामतीचा मल्ल भारत मदने याने शाहू … Read more
गहिनीनाथ ऊरूस कालावधीत 24 तास आरोग्य विभाग यंत्रणा कार्यरत
कागल : कागल नगरपरिषद आरोग्य विभागाचे वतीने गहिनीनाथ उरूसा निमित्ताने 24 तास यंत्रणा सुरू ठेवली आहे. यामध्ये 100 कर्मचारी काम करत आहेत, रस्ते सफाई सकाळी आणि संध्याकाळी या दोन सत्रात महिला सफाई कर्मचारी यांचे वतीने सुरू ठेवली आहेत. तसेच कचरा उठाव 24 तास सुरू ठेवला आहे या करिता 15 कर्मचारी काम करत आहेत 10 घंटागाडी दैनंदिन … Read more
भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा
पिंपळगाव खुर्द (प्रकाश पाटील) : भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने त्यांना मिळालेला मतदानाचा पवित्र हक्क १०० टक्के बजावावा असे आवाहन कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे यांनी केले. व्हन्नूर (ता.कागल) येथे स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत कागल तहसील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली, गीत गायन कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे … Read more