मुरगूड (शशी दरेकर) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “विज्ञान, व्यवसाय आणि मानव्यशास्त्र या विद्याशाखांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहयोगी नवकल्पना (ICBGCI-2024)” या मुख्य विषयावर शोधनिबंध सादरीकरण व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.
यामध्ये व्यवसाय/व्यवस्थापन, वाणिज्य, जीवशास्त्रे, रसायनशास्त्र, गणित, विविध भाषा व सामाजिक शास्त्रे, सांख्यिकी, पदार्थविज्ञान शास्त्र, सामाजिक उद्योजकता, जागतिक व्यापार व अर्थशास्त्र, सांस्कृतिक धोरणाचा अभ्यास या व ईतर संबंधित उपविषयांवरील शोधनिबंध दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मागविण्यात येत आहेत.
ते भूमी प्रकाशन (Imapact Factor-5.48) च्या ISBN शोधनिबंध पुस्तिकेमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. तरी प्राध्यापक, व्यवसायिक आणि संशोधक विद्यार्थी यांना शोधनिबंध पाठविण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. परिषदेची नोंदणी फी ५००/- रुपये व शोधनिबंध प्रकाशन फी ५००/- रूपये अशी आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला संशोधकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी दिली. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. पानारी, निमंत्रक डॉ. संतोष भोसले व प्रा. राहुल कांबळे, समन्वयक प्रा. ए. एस. कांबळे व प्रा. ए आर. गावकर आणि खजिनदार प्रा. एस. एस घाटगे हे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क 9226278775 व 9096733611.