कागल /प्रतिनिधी : बियर बार मध्ये झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात एका तरुणास गंभीर जखमी केल्याचा प्रकार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. वैभव शिवाजी कदम राहणार अनंत रोटो कागल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतिश अशोक माने वय वर्ष 26 राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,कागल मध्ये एका बियर बार मध्ये दोन तरुणात वादावादी झाली . तुला सोडत नाही अशी धमकी देत अतिश माने यास शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली.
आरोपी वैभव याने रागाच्या भरात त्याच्याकडे असलेल्या चाकूने अतीशच्या कमरेवर व हाताच्या मनगटावर हल्ला केला त्यात अतिशय हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील गावच्या कमानी जवळ घडला. जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी कागल पोलीस ठाण्याचे अध्यक्ष गजेंद्र लोहार व पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे यांनी तात्काळ धाव घेवुन घटनेची माहिती घेतली. व आरोपी वैभव यास ताब्यात घेतले.पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक डिगोळे हे करीत आहेत.
Tech to Force This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!