ओबीसी जनमोर्चाच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी विजय मांडरेकर यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ओबीसी समाज घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारे ओबीसी कार्यकर्ते विजय मांडरेकर यांची निवड करण्याचा निर्णय चौंडेश्वरी मंदिर सभागृह येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या प्रमुखांच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.

Advertisements

    कोल्हापूर शहरात ओबीसीं युवकांचे संघटन उभारण्यात येणार आहे. युवकांच्या संघटनेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन विजय मांडरेकर यांनी केले.
   या बैठकीत ओबीसी जनमोर्चा चे सरचिटणीस दिगंबर लोहार,राज्य सचिव सयाजी झुंजार एकनाथ कुंभार यांनी मार्गदर्शन केले. तर सर्वश्री बाळासाहेब लोहार, तानाजी मर्दाने, सचिन सुतार, प्रशांत हावळ,शितल मंडपे, चंद्रकांत कोवळे, अनिल खडके, प्रदीप ओतारी, सुखदेव सुतार, सुनील महाडेश्वर, राजू रसाळ,पांडुरंग परीट आदी उपस्थित होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहन हजारे होते. स्वागत व आभार करवीर तालुका अध्यक्ष पंडित परीट यांनी मानले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!