मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील दुय्यम निबंधक श्रेणी,१ कार्यालयाचे दुय्यम निबंधक एन.डी. गोंधळी यांना महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल व वन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘आदर्श अधिकारी पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले.
राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्व असून ते लक्षात घेवून १ ऑगस्ट या महसूल दिनी कायदा व सुव्यवस्था,नैसर्गिक आपती, मक्तकार्य, महसूल वसुली, निवडणूक इत्यादी तसेच नियमित दैनंदिन कामकाजामध्ये सन २०२१ – २०२२ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल आणि जनतेला तत्पर सेवा देऊन निबंधक विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल कागल येथे दुय्यम निबंधक श्रेणी,१ कार्यालयाचे दुय्यम निबंधक एन.डी.गोंधळी यांना ‘आदर्श अधिकारी पुरस्कार’ तर कर्मचारी भिकाजी वडरे यांना ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कार तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.मुरगूड कार्यालयाच्या इतिहासात हा पहिलाच गौरव करण्यात आला आहे.
दरम्यान मुरगूड कार्यालयात श्री. गोंधळी व श्री. वडरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मधुरा तायशेटे, शिवाजी वारके,युवराज साठे, संदिप सुर्यवंशी, अरुण ढोले, प्रकाश तिराळे, राजू चव्हाण, सचिन मगदूम ,विठ्ठल पाटील, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
सत्कार करताना कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर चे उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, राजू चव्हाण, अरुण ढोले ,शिवाजी वारके आदी.