मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सह .पंत संस्थेला १ कोटी९७ लाख६९ हजार ८८५ रुपयाचा ऐतिहासिक असा विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री . पुंडलिक नाना डाफळे यानीं साप्ता. गहिनीनाथशी बोलतानां दिली. संस्थेच्या ५६ वर्षाच्या इतिहासात इतका विक्रमी नफा मिळण्याची ही आनंददायी अशी घटना असून गेल्या वर्षात ( २०२०-२१ ) तुलनेत यंदाच्या ( २०२१-२२ ) या वर्षात एकूण ९० लाख९० हजार२६९ रुपये इतकी वाढ झाल्याची श्री .डाफळे यानीं सांगितले. श्री .डाफळे म्हणाले संस्थेच्या मुरगूड मुख्य शाखेसह कूर ( ता. भुदरगड ), सरवडे ( ता. राधानगरी ), सावर्डे बुII ( ता. कागल ) व सेनापती कापशी ( ता. कागल ) या ५ शाखा आहेत . या सर्व शाखा अंतर्गत एकून ६३ कोटी७० लाख१९ हजारावर ठेवी असून ४६ कोटी४४ लाख७५ हजारावर कर्ज वाटप केले आहे.
ते पुढे म्हणाले संस्थेची वार्षिक उलाढाल ३६७ कोटी२४ लाख ८९ हजारावर आहे . तर संस्थेचे खेळते भांडवल१०० कोटी४८ लाख ८३हजार इतके विक्रमी झाले आहे. संस्थेकडील ३३१५ सभासदांचे १ कोटी६६ लाख३१हजारावर भागभांडवल जमा असून ३ कोटी४८ लाख९२हजारांचा स्वनिधी आणि २ कोटी४२लाख९२ हजार राखीव निधी आहे.
संस्थेची २८ कोटी३५ लाख७८हजाराची सुरक्षित गुंतवणूक असून थकबाकीचे प्रमाण ० टक्के आहे .एन.पी. ए .१टक्के सी.डी. रेशो ६४ .६४ टक्के इतका आहे. श्री .डाफळे शेवटी म्हणाले सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या या ऐतिहासिक यशात संस्था उपसभापती श्री .रविंद्र खराडे , संस्थापक संचालक श्री .जवाहर शहा , संचालक सर्वश्री श्री . अनंत फर्नांडीस, श्री . दत्तात्रय तांबट, श्री . किशोर पोतदार , श्री .विनय पोतदार , श्री . चंद्रकांत माळवदे ( सर ) , श्री . दत्तात्रय कांबळे , तज्ञ संचालक जगदिश देशपांडे , संचालिका श्रीमती भारती कामत , सौ . सुजाता सुतार , कार्यकारी संचालक श्री . नवनाथ डवरी , सचिव श्री . मारूती सणगर ,यांचा पारदर्शक कारभार व शाखाधिकारी सौ . मनिषा सुर्यवंशी ( मुरगूड ) , श्री. राजेंद्र भोसले ( सेनापती कापशी ) ,श्री .के.डी. पाटील ( सरवडे ), श्री . अनिल सणगर ( सावर्डे बुII ) , श्री . रामदास शिऊडकर ( कुर ) व सेवकवृंद यांच्या तप्तर आणि आपुलकीच्या सेवेमुळे आजवर संस्थेची यशस्वी घौडदौड सुरु आहे .