लक्ष्मीनारायण’ कडून २७ लाख ७ हजार रु. लाभांश वाटप
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या सन २०२३-२४ या अर्थिक वर्षातील २ कोटी ५२ लाख ७१ हजारांच्या विक्रमी निव्वळ नफ्यातून सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असून त्याद्वारे २७ लाख ०७ हजारांचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा विद्यमान चेअरमन किशोर पोतदार यांनी केली. ५८ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
सभापती पोतदार म्हणाले, लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पत संस्था आपल्या आर्थिक नियोजनामुळे आणि पारदर्शक कारभारामुळे यशस्वी ठरली आहे .संस्थेने गेल्या अहवाल सालात ४८० कोटी ५७ लाखांचा विक्रमी व्यवसाय केला असून त्यात १०० कोटी ४२ लाखांच्या ठेवीच्या आधारे ६८ कोटी २८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे त्यापैकी ४१ कोटी ९६ लाखांचे कर्ज हे सोनेतारणावरील आहे. चालु वर्षी संस्थेच्या ४५ लाख रुपयाचा संस्था महोत्सव निधी अंतर्गत सभासदांना दिपावली भेट वस्तू देण्याचा संकल्प आहे.
संचालक जवाहर शहा यांनी संस्था स्थापनेपासुनची माहिती सभासदांना दिली तसेच संचालक पुंडलिक डाफळे यांनी ३१ मार्च २०२४ नंतर ४ महिण्यातील संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.
दिपप्रज्वलन व लक्ष्मी नारायण प्रतिमेचे पुजन यावेळी दहावी व बारावी परिक्षेतील गुणवता प्राप्त विद्यार्थी व पाल्यांना बक्षीस वितरण करणेत आले. यावेळी कै. शंकर गणपती शिरगांवकर यांचे स्मरणार्थ दत्तात्रय शिरगांवकर यांचेकडून प्रत्येकी रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह ही बक्षीस देण्यात आले. यावेळी वैभव विश्वनाथ वंदुरे शिंदेवाडी यांचा एमपीएससी मधून पीएसआय पदी निवड झालेबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला .
जनरल मॅनेजर नवनाथ डवरी यांनी अहवाल वाचन केले. जोतीराम सुर्यवंशी, विनायक हावळ, राजेंद्र मगदुम, रामचंद्र मगदुम, सुदर्शन हुंडेकर, दिपक घोरपडे, नामदेव शिंदे , संजय सोनार, हरी वंदुरे, दिलीप शिंदे, आनंदा सव्वाशे, इ. सभासदांनी चर्चेत भाग घेतला. आभार संचालक विनय पोतदार यांनी मानले.
यावेळी संचालक दतात्रय तांबट, रविंद्र खराडे, अनंत फर्नाडीस, सौ. सुनिता शिंदे, सौ सुजाता सुतार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे व श्रीमती. भारती कामत यांच्यासह सचिव मारुती सणगर, मुख्य शाखा मुरगूडचे शाखाधिकारी सौ. मनिषा सुर्यवंशी, तुकाराम दाभोळे ( सेनापती कापशी) रामदास शिऊडकर (सावर्डे बु॥), बाळासो पाटील ( कूर), के. डी. पाटील ( सरवडे), राजेंद्र भोसले (शेळेवाडी), अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.