मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ जयश्री प्रकाश जठार यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली निवड समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सौ. जयश्री दिलीप कुरडे होत्या यावेळी मावळत्या उपसरपंच सौ शुभांगी कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी जठार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सरपंच जयश्री कुरडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कुरडे, अभिजीत पाटील, अरविंद जठार, भुदरगड तालुका कामगार सेलचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, देवस्थान समितीचे सदस्य जोतीराम आरडे, दीलीप कुरडे, सागर कांबळे, ग्रामसेवक तानाजी शिंदे, तलाठी के.एम जरग, सचिव दयानंद कांबळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामसेवक तानाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नंदकुमार पाटील यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल येथील ध्वजारोहण केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व शिक्षक वाय. बी.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक अशोक मारुती बरकाळे, एस के पोवार, डी.पी पाटील, व्ही.व्ही.कुराडे, शिक्षक, शिक्षिका यांच्यासह कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता