कुरणीच्या युवकाचा पुण्यात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरणी ता. कागल येथील पांडुरंग शंकर पाटील (वय 30 वर्ष) यांचे अपघाती मृत्यू झाले. पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये ते बाऊन्सर पदावर सेवेत होते. पुण्यामध्ये भोसरीत ते एकटेच घरात एकटेच राहत होते. बाथरूममध्ये पाय घसरून वर्मी मार लागल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Advertisements

घटनेची नोंद पुण्याच्या भोसरी पोलिस ठाण्यात झाली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. आकस्मात एकुलत्या एक मुलग्याच्या अपघाती मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूल वातावरणात कुरणीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई-वडील आहेत. रक्षाविसर्जन रविवार दि. 05 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. कुरणी येथे आहे.
……………………………………….

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!