स्वातंत्र्यदिनी कागल येथील डॅाक्टरांचा गौरव; अनंतशांती सामाजिक संस्था व पत्रकार संघटनेचा उपक्रम
साके(सागर लोहार) : कोरोनाने जगभर दहशत माजवली ही दहशत इतकी जबरदस्त होती की, कोरोना झाला की माणूस मेला अशी मानसिकता समाजाची तयार होत असताना दुस-या बाजूल याच्यावर कोणतेही ठोस आौषध नसताना देखील सरकारी यंत्रणा आणि कर्मचा-यांनी स्वताचा जीव घहान ठेवून रूग्णांवर यशस्वी उपचार केले आणि सरकारी यंत्रणेवरील विश्वास दृढ केला असे प्रतिपाद जिल्हा बॅंकेचे संचालक व संजय गांधी निराधार योजेनेचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सरकारी यंत्रणेमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक आणि शारिरीक हानी होण्यापासून वाचली असे त्यांनी पुढे कबूल केले. कागल कोव्हिड सेंटर येथे अनंतशांती बहुउद्देशिय संस्था व कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स यांच्या सैाजन्याने डॅाक्टरांच्या कोव्हिड काळातील रूग्णसेवे बद्दल राज्यस्तरीय जीवनगैरव पुरस्कार सन्मान सोळ्यात ते बोलत होते. प्रमुख उपस्थीत कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर होते. यावेळी कोव्हिड सेंटर मधील डॅाक्टरांना प्रताप उर्फ भैया माने, रमेश तोडकर, बाळासाहेब तुरंबे, भगवान गुरव, माधुरी खोत यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भैया माने पुढे म्हणाले, जगभर तीसरी चैाथी लाट येण्याची भिती वाटत असताना देखील आपल्या सरकारी डॅाक्टरांनी जराही न डगमगता कोठेही पळ काढलेला नाही. डॅाक्टरांच्या या मानसिकतेमुळे डेल्टा प्लस हा विषाणू देखील आपले नागरिक पळवून लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॅा .रवि बल्लुर्गी म्हणाले, रूग्णसेवा हिच इश्वर सेवा माणून मी व सर्व डॅाक्टरर्स, स्टाप आम्ही गेल्या दिड वर्षापासून कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत आहोत. शेकडो रूग्ण येथून योग्य उपचार घेवून घरी सुखरूप पोहचले आहेत. संस्थेमार्फत आमचा केलेला गैारव हा आम्हाला उमेदेने काम करण्यास सार्थ ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास डिस्ट्रीक्ट रिपोटर्सचे तानाजी पाटील, कागल तालुका अध्यक्ष सागर लोहार, नंदकुमार कांबळे, डॅा. अश्विणी खोराटे, डॅा. रूपाली लोकरे, अनघा पाटील, अमर निळपणकर, उपस्थीत होते.
स्वागत प्रा. भास्कर चंदनशिवे यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.